आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा जन्मानं मराठी आणि कर्मानं तामिळी असलेल्या मेगास्टार राजनीकांतचा चित्रमयी प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेमेही ज्याच्या स्टाईलची कॉपी करतात, ज्याचे सिनेमे कोट्यवधींची कमाई करतात, आणि जो दक्षिण भारतातल्या फॅन्ससाठी देवासमान आहे... अशा या अभिनयाच्या देवाचा अर्थातच अभिनेता रजनीकांतचा आज वाढदिवस आहे.
रजनीकांत यांनी आज वयाच्या 64 व्या वर्षात पदार्पण केले आहे. रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांतचे चाहते आहेत. 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होता.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारनं 'अंधा कानून' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळं पुन्हा एकदा त्यानी आपलं लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केलं. दोन वर्षापूर्वी आलेल्या 'शिवाजी, द बॉस' आणि 'रोबोट' या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांतला डोक्यावर घेतलं. आणि तो केवळ साऊथचाच नाही तर संपूर्ण भारताचा सुपरस्टार असल्याचं शिक्कामोर्तब केलं.
2007 साली रिलीज झालेल्या 'शिवाजी द बॉस' या सिनेमासाठी रजनी यांना तब्बल 26 कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणा-या टॉप 10 सिनेमांपैकी एक होता.
मराठमोळ्या रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पूरस्कारानेही सन्मानित केले आहे.
आज रजनीकांत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला रजनीकांत यांचा प्रवास छायाचित्रांमधून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रजनीकांत यांची खास छायाचित्रे...