आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या लता दीदी, विष देऊन झाला होता जीवे मारण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक'आज तुम्ही रिजेक्ट केलं. मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडून तिला आपल्या सिनेमात गाणं गाण्याची विनंती करतील.'

'शहीद' या सिनेमाचे दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप पातळ असल्याचे कारण देत त्यांना रिजेक्ट केले होते. तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी रागात येऊन ही भविष्यवाणी केली होती.

1940 आणि 50च्या दशकात भारी आणि दमदार आवाज असलेल्या नूरजहां, शमशाद बेगम आणि जोहराबाई अम्बालेवाली या गायिकांचे प्रभुत्व होते. याच कारणामुळे शहीद या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये लता मंगशेकर यांना रिजेक्ट करण्यात आले होते. त्यानंतर गुलाम हैदर यांनी स्वतः 'मजबूर' या सिनेमात लता मंगशेकर यांना गाण्याची संधी दिली.

'महल' सिनेमातील 'आएगा आले वाला...' हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे सुपरहिट ठरले आणि त्यांचा आवाज फिल्म इंडस्ट्रीचा सुरेल आवाज बनला. गुलाम हैदर यांनी केलेले भविष्यवाणी अखेर खरी ठरली.

गानकोकिळा लता दीदींनी आपल्या अवीट सूरांनी सात दशकांहून अधिक काळ जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

आज दीदींच्या वाढदिवासाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या लता दीदींविषयी तुम्हाला ठाऊक नसलेल्या गोष्टी, सोबतच खासदार झाल्यानंतर दीदींनी कोणते काम केले होते आणि कसा झाला होता त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न...