आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast From The Past: When Barbara Mori Wreaked Havoc In Hrithik Roshan’s Married Life

B\'DAY SPL: बार्बरामुळे हृतिकच्या आयुष्यात आले वादळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिकनची हॉट अभिनेत्री बार्बरा मोरीचा आज वाढदिवस आहे. तिने हृतिक रोशनसोबत 'काइट' सिनेमात स्क्रिन शेअर करून बॉलिवूडमध्ये प्रसिध्दी मिळवली होती. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या बातम्या त्यावेळी माध्यामांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या.
हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटासाठी बार्बरा कारणीभूत असल्याचेही सांगितले जात होते. सध्या हृतिक आणि सुझान एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
हृतिक आणि बार्बरा 'काइट' सिनेमाच्या शुटिंगवेळी डेटिंग करत होते. सिनेमात दोघांमध्ये काही इंटीमेट सीन्ससुध्दा चित्रीत करण्यात आले होते. त्यावेळी तो सिनेमा वादाच्या भोव-यात देखील अडकला होता, कारण यापूर्वी हृतिकने इतके हॉट इंटीमेट सीन्स कधीच दिले नव्हते.
वडीलांसमोर बार्बरासोबत इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यासाठी हृतिकला अनकम्फर्टेबल वाटत होते, म्हणून राकेश रोशन सीन चित्रीत होईपर्यंत सेटच्या बाहेर थांबले होते.
हृतिक आणि बार्बरा सिनेमाच्या सेटवर बराच वेळ एकत्र घालवत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये जवळीक वाढल्याचे दिसून आले होते.
सुझानला जेव्हा हृतिक आणि बार्बराच्या जवळीकविषयी कळले तेव्हा ती त्याचे घर सोडून तिच्या आई-वडीलांच्या घरी राहायला निघून गेली होती.
बार्बराला 'काइट' सिनेमाची भूमिका देण्यापूर्वी दीपिका आणि सोनम कपूरला या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीची ऑफर देण्यात आली होती. सिनेमाच्या इंटीमेट आणि बोल्ड सीन्समुळे दोघींनीही या सिनेमाला नकार दिला होता. त्यानंतर सिनेमाच्या पटकथा आणि अनेक सीन्समध्ये बदल केल्यानंतर बार्बराला सिनेमाची अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हृतिक आणि बार्बराची काही खास छायाचित्रे...