आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा बॉबीचे लाड करताना पप्पा धर्मेंद्र, पाहा देओल कुटुंबीयांचे खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते धर्मेंद्र यांचा लाडका मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज (27 डिसेंबर) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉबीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. 1995 साली रिलीज झालेल्या 'बरसात' सिनेमाद्वारे त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
याशिवाय 2002 साली रिलीज झालेल्या 'हमराज' सिनेमासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. बॉबीने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक काम थ्रिलर सिनेमांमध्ये केले होते. बादल, अजनबी, हमराज, अपने, गुप्त, जुर्म, बिच्छू, अजनबी, दोस्ताना आणि यमला पगला दिवाना हे त्याच्या करिअरमधील काही उल्लेखनीय सिनेमे आहेत.
मुंबईत जन्मलेल्या बॉबीचे शिक्षण अजमेरमध्ये झाले. तान्या आहुजा हे त्याच्या पत्नीचे नाव असून त्यांना दोन मुले आहेत. आर्यमान आणि धरम ही त्यांची नावे.
बॉबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या कुटंबातील सदस्यांची खास छायाचित्रे दाखवत आहोत. विशेष म्हणजे, या छायाचित्रांमध्ये बॉबीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची झलक तुम्हाला पाहायला मिळेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा देओल कुटुंबाची खास छायाचित्रे...