आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बॉबी देओलची फिल्म फॅक्टरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनय करत निर्माते बनणार्‍या सिनेतार्‍यांच्या श्रेणीत आता बॉबी देओलचे नावही जोडले जाणार आहे. देओल कुटुंबाचा हा लाडका पुत्र अभिनयासह चित्रपट निर्मितीतही आपले नशीब आजमावणार आहे.

‘यमला पगला दिवाना-2’ प्रदर्शित झाल्यानंतर बॉबी आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीचे काम सांभाळेल. बॅनर तर देओल कुटुंबीयांच्या विजेता फिल्म्सचेच असेल, परंतु बॉबी एकाचवेळी चार चित्रपटांचे काम सुरू करणार आहे. तो सध्या दोन प्रमुख पटकथांवर काम करत आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘चिअर्स’ असेल. याचे दिग्दर्शन ‘यमला पगला दिवाना’चे दिग्दर्शक संगीत सिवन किंवा ‘ओह माय गॉड’चे उमेश शुक्ला करतील. दुसरा चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘गॉडफादर’ या इंग्रजी चित्रपटाने प्रेरित संहितेवर आधारित आहे. सध्या ‘यमला..’च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र असलेला बॉबी दोन्ही प्रोजेक्ट्सला शूटिंग फ्लोअरवर घेऊन येईल. वडील धर्मेंद्र यांच्यासोबत सनी आणि बॉबी यांची केमिस्ट्री हे या दोन्ही चित्रपटांचे वैशिष्ट्य असेल.