आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मोहनीश बहलच्या फार्म हाऊसवर सापडले मृत बाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधील फार्म हाऊसवर एक दिवसाचे मृत बाळ सापडले आहे. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडला. ठाण्यातील मुंब्रा-कळवा रोडवर हे फार्म हाऊस आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहलने पोलिसांकडे धाव घेतली.
स्त्री जातीचे हे अर्भक मोहनीश बहलच्या बंगल्यावर काम करणा-या चौकीदाराला आढळून आले. छिन्न विछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडल्याचे सांगितले जाते.
मोहनीश बहल आणि त्यांचे कुटुंबीय फार क्वचितच या बंगल्यात येत असतात. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.