बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शन आमिर खान आणि किरण राव यांच्या लग्नाचा वाढदिवस 28 डिसेंबरला आहे. 2005 मध्ये आमिर आणि किरण लग्नाच्या बेडित अडकले होते. यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी त्यांची पंचगनीला लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळीसुध्दा आमिर पंचगनीलाच लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची योजना करत आहे. आमिर आणि किरणची ओळख 'लगान' सिनेमाच्या सेटवर झाली होती. आशुतोष गोवारिकरच्या 'लगान' सिनेमात किरण राव असिस्टंट डायरेक्टर होती. दोघांमध्ये मैत्री वाढली. ह्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी 2005 मध्ये लग्न केलं. किरणने लग्नानंतर तिची ओळख कायम ठेवली. त्यांनी 'धोबी घाट' सिनेमाच दिग्दर्शन केलं. दोघांना एक मुलगा आहे. आमिरने त्याच्या मुलाच नाव आजाद राव ठेवलं आहे. किरण राव आमिरची दुसरी पत्नी आहे तर त्याची पहिली पत्नी रीना दत्त होती. रीना आणि आमिरला दोन मुलं आहेत, इरा आणि जुनैद. 2002 मध्ये अमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला होता. आमिरसाठी हे वर्ष खूप चांगल होतं कारण या वर्षी त्याचा 'धूम 3' रिलीज झाला आहे. या सिनेमाने परदेशात उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे आणि 200 कोटींपेक्षा जास्त कमाईसुध्दा केली आहे .
चला आम्ही तुम्हाला दाखवतो आमिर आणि किरणच्या लग्नाचे आणि एकमेकांसोबत घालवलेल्या आठवणीतील क्षणांचे काही खास छायाचित्रे...