आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actor Ajay Devgaon Comment On Family Life

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशस्वी विवाहामागे विशेष गुपित नाही : अजय देवगण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंडोलीम- काजोलसोबतच्या यशस्वी वैवाहिक जीवनाला 15 वर्षे पूर्ण होण्यामागे कोणतेही विशेष गुपित नाही, असे मत अभिनेता अजय देवगणने व्यक्त केले आहे. अजय-काजोल यांचा विवाह 1999 मध्ये झाला. त्यांना न्यासा ही कन्या आणि युग हा मुलगा आहे.

माणसाने स्वत: आनंदी राहावे आणि दुसर्‍यालाही आनंद द्यावा. यशस्वी लग्नासाठी कोणताही विशेष मंत्र नाही. तुम्ही आयुष्यामध्ये दुसर्‍याला सन्मान आणि तेवढेच महत्त्व द्या. लग्नबंधनात बांधिलकी असावी. त्यानंतर सर्व गोष्टी आपोआप मार्गी लागतात, असे अजय म्हणाला. या गोष्टी बॉलीवूडमध्येच नव्हे तर अन्य क्षेत्रातही होतात. हा विषय व्यक्तिसापेक्ष असून तो प्रत्येकाच्या परस्पर समजुतीवर अवलंबून आहे, असे अजय म्हणाला.
प्रभुदेवाचा ‘अँक्शन जॉक्शन’ आणि रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 2’ चित्रपटांत अजय सध्या काम करत आहे. ‘अँक्शन जॉक्शन’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून ‘सिंघम-2’ साठी अद्याप प्रतीक्षा आहे.