आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सह अभिनेत्रींसोबत बोल्ड सीन्सची पत्नीला काळजी नाही: अर्जुन रामपाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सह अभिनेत्रींसोबत बोल्ड सीन्स केल्याने पत्नी त्याबाबत अजिबात काळजी करत नसल्याचे अभिनेता अर्जुन रामपाल याने सांगितले. सुपर मॉडेल मेहर जेसिका त्याची पत्नी आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘डी- डे’ या चित्रपटात अर्जुनने श्रुती हसन हिच्यासोबत एक बोल्ड सीन दिला आहे. तो म्हणाला, चित्रपटात काम करत असल्याने पत्नीला या क्षेत्रातील सर्वकाही माहित असते. तसेच मी कामाबाबत तिच्यासोबत अजिबात चर्चा करत नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच तिला माझ्या भूमिका पडद्यावर बघण्यास मिळतात. मेहरला माझे ‘राजनीती’ व ‘डी-डे’ या चित्रपटातील काम विशेष करून आवडल्याचे अर्जुनने सांगितले. अर्जुन सध्या प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटातही काम करत आहे. चित्रपटातील त्यांच्या कमाचे याआधी अनेकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे त्याच्याकडून खुप अपेक्षा आहेत.