आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप साहेबांचे चरित्र वाचकांना प्रेरणादायी ठरेल : सायराबानो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘एकेकाळी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणार्‍या दिलीपकुमार यांची पडद्यामागची व्यक्तिरेखा मांडण्याबरोबरच त्यांच्या विविध पैलूंचा, योगदानाचा वेध घेणारे त्यांचे चरित्र वाचकांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.’ असे हृद्य मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री व दिलीपकुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी व्यक्त केले.

दहा वर्षांपासून लेखनप्रक्रियेत असलेले दिलीपकुमार यांच्या ‘द सबस्टन्स अ‍ॅँड द शॅडो’ या चरित्राचे सोमवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या. हे चरित्र दिलीपकुमार व त्यांच्या कुटुंबीयांशी गेल्या 40 वर्षांपासून स्नेह व परिचय असलेल्या ज्येष्ठ लेखिका व पत्रकार उदय तारा नायर यांनी लिहिले आहे.

सायराबानो म्हणाल्या, ‘या चरित्रासाठी आम्ही सगळ्यांनीच अपार मेहनत घेतली आहे. यातील प्रत्येक प्रकरण हे दिलीपकुमार यांच्याबरोबर त्या काळातील बॉलीवूडचे एक सक्षम चित्रण टिपते. वाचकांनी या चरित्राचा जसे लिहिले आहे तसाच अन्वयार्थ लावणे आम्हांस अपेक्षित आहे.’
दिलीपकुमार यांच्याविषयी पत्नी म्हणून, सहचर म्हणून बोलताना सायराबानो कलाकारांच्या भव्य उपस्थितीमुळे भारावून गेल्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर दिलीपकुमार, सायराबानो यांच्यासह अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान, चरित्राच्या लेखिका उदय तारा नायर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला, फरिदा जलाल, जितेंद्र, झीनत अमान, डॅनी डेंझोपा, प्रियंका चोप्रा, संजय लीला भन्साळी, माधुरी दीक्षित, सुभाष घई, जावेद अख्तर आदींची उपस्थिती होती.
आमिरची कविता : प्रसून जोशी यांनी खास लिहिलेल्या कवितेचे आमिर खान याने वाचन केले. 91 वर्षांचा समृद्ध काळ अनुभवलेल्या दिलीपकुमार यांना एक अनोखा सलाम आमिरने केला.