आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारुख शेखच्या निधनाने दु:खात बुडाले बॉलिवूड, जाणून घ्या कोण काय म्हणाले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द अभिनेता फारुख शेख यांचा हृदय झटक्याने निधन झाले आहे. 65 वर्षाच्या या अभिनेत्याने दुबईच्या हॉस्पीटलमध्ये सकाळी 8 वाजता शेवटचा श्वास घेतला. आताच्या 'ये जवानी है दिवानी' आणि 'शांघाई' या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. आता सध्या ते 'क्लब 60'मध्ये काम करत होते. 25 मार्च 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1973मध्ये 'गरम हवा' या सिनेमातून अभिनयाला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी 1977मध्ये 'शतरंग के खिलाडी' 1979 'नुरी', 1981 'चश्मे बहाद्दूर', 1983मध्ये 'कसी से ना कहना' या सिनेमांत उत्कृष्ट अभिनय केला. दीप्ती नवलसोबत त्यांनी अनेक अभिनय केले होते.
90च्या दशकात त्यांनी सिनेमात काम करणं कमी केलं होतं आणि टीव्हीवरील मालिकांकडे त्यांनी कल वाढवला होता. त्यांनी सोनी चॅनलवरील 'चमत्कार' आणि 'स्टार प्लस' चॅनलवर 'जी मंत्रीजी' सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता. यापूर्वी त्यांनी 1985 ते 1986च्या दरम्यान 'श्रीकांत' नावाच्या मालिकेत काम केलं होतं. याचबरोबर त्यांनी 'जीना इसी का नाम है' या मालिकेच्या होस्टचा अभिनय केला होता. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांच्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
फारुख शेख यांच्या निधनाचे वृत्त ऐकून बॉलिवूडमधील वातावरण शोकाकुल झालं आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे कलाकार याबद्दल काय म्हणाले?