आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Ranjeet’S Servant Found Dead At His Home

अभिनेता रंजीत यांच्या घरात आढळला नोकराचा मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे सुप्रसिध्द खलनायक रंजीत यांच्या मुंबई जुहू परिसरातील घरात नोकर नागराजचा मृतहेद आढळला आहे.
जेव्हा दिव्य मराठी डॉट कॉमने रंजीत यांना याविषयी विचारले तेव्हा त्यांनी त्याचे स्पष्टिकरण दिले. रंजीत म्हणाले, 'हो माझा नोकर रात्री 12च्या जवळपास स्वीमिंग पूलमध्ये मृत आढळला. तो 30 वर्षांपासून माझ्या इथे काम करत होता आणि तो माझा ड्राइव्हर होता.'
त्यांनी पुढे सांगितले, 'नागराजला विविध आजारांनी त्रासलेला होता. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत आमच्या क्वॉर्टरमध्ये राहत होता.'
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत यांच्या पत्नीने सर्वात पहिले नागराजचा मृतदेह बघितला आणि लोकांना सांगितले.
नागराजचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची तपासणी चालू आहे. पोलिसांनी आत्महत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे.