आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मौसम’च्या अपयशानंतरही मिळाल्या 18 चित्रपटांच्या ऑफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कधी कधी हिट्सपेक्षा अपयशी चित्रपट तुमच्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देतात, अशी प्रतिक्रिया अभिनेता शाहिद कपूरने दिली आहे. 2011 मध्ये ‘मौसम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला असला तरी त्यानंतर आपल्याला तब्बल 18 चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या, असा खुलासा शाहिदने केला आहे. त्यामुळे फक्त चित्रपट यशस्वी झाला तरच तुमच्यासाठी संधी निर्माण होतात असे नाही, तर त्या चित्रपटातील तुमच्या भूमिकेवरही बरेच काही अवलंबून असते, असे त्याने सांगितले.