आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Shahrukh Khan And Priyanka To Performers At Jaipur

गुलाबी शहर जयपुरात शाहरुख-प्रियंकाचा आज परफॉर्मन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरमध्ये बॉलीवूडचे तारे-तारका अवतरल्या आहेत. राजकीय नेते, बड्या हस्तींचीही हजेरी पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे दक्षिण आफ्रिकेतील उद्योगपती टीना गुप्ता यांच्या मुलीच्या रविवारी होणार्‍या शाही विवाह सोहळ्याचे.
सोहळ्याची झलक शुक्रवारी सायंकाळीच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. सेलिब्रिटीजच्या स्वागतासाठी घोडागाडी, बग्गी सज्ज होत्या. घोडागाडीने पहिल्या दिवशी सेलिब्रिटीज मंडळी आपल्या राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणी गेले. त्यात अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, कैलाश खेर यांच्याशिवाय रिअँलिटी शो फेम मयंग चँग, करिष्मा तन्ना इत्यादी स्टारचा समावेश आहे. या शाही विवाह सोहळ्यात शाहरुख खान, प्रियंका चोप्रादेखील विशेष पाहुणे असतील. लोहाडिया इव्हेंटचे भारत जैन म्हणाले, विवाहासाठी जयपूरमध्ये विशेष सोय करण्यात आली आहे. पाहुण्यांना हेरिटेज व राजेशाही वागणूक दिली जात आहे. त्यात संगीतासाठी बॉलीवूड गायक सुखविंदरसिंग जयपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्याशिवाय सोनू निगम, मिकासिंग, र्शेया घोषाल यांची संगीत रजनी होणार आहे. हा विवाह सोहळा 8 डिसेंबरला पार पडणार आहे.