आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणाचा तपास अखेर \'सीबीआय\' करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे. जिया खानच्या मृत्यूप्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून हे तिच्या मृत्यूचा तपास 'सीबीआय'कडे सोपविण्याचा निर्णय अखेर गुरुवारी घेण्यात आला आहे. यापूर्वी जिया खानची आई राबिया खान यांनी जियाने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी राबिया खान यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

सीबीआयने आपल्या युक्तीवादात सांगितले, की त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यावर कोर्टाने सीबीआयला चांगलेच फटकारले. त्यानंतर सीनियर काउंसिलला कोर्टात बोलावण्यात आले. जिया खानच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीअायकडे देण्याचे आदेश दिले. जिया खानची हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाल्यास गुन्हेगाराला तत्काळ अटक करावी, असेही कोर्टाने सांगितल्याची माहिती जियाचे वकील दिनेश तिवारी यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचे सांगत अमेरिकेच्या 'एफबीआय' संस्थेची मदतही मागितली होती. 'एफबीआय'ही मदतीस तयार झाले होते. दरम्यान राबिया यांनी पोलिसांविरुद्ध स्टिंग ऑपेरशनही केले. त्याआधारे स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी पुराव्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आढळून आल्याचे राबिया यांनी म्हटले होते.
(फाइल फोटो: मृत अभिनेत्री जिया खान)