आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानचे यश अन् शेवटही झटपट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वयाच्या 19 व्या वर्षी सुरू झालेले जियाचे करिअर 25 व्या वर्षी तिने संपवून टाकले. अकाली मिळालेल्या प्रसिद्धीच्या मोहात पडलेल्या जियाने तितक्याच खिलाडू वृत्तीने माघार स्वीकारली नाही. फीनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडण्याचे धैर्य ती गोळा करू शकली नाही. झटपट यश मिळवण्याच्या प्रयत्नात तिने मृत्यूही झटपट मिळवला. इंडस्ट्रीने खड्यासारखे बाजूला काढल्याची भावना असो किंवा बॉयफ्रेंडबरोबर झालेले ब्रेकअप असो, जियाच्या मृत्यूचे खरे कारण तिने पत्करलेली ‘हार’ हेच आहे.

न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली नफिसा मुंबईत आली ती हीरोइन बनण्यासाठी. तिची आई रबिया अमीन 80 च्या दशकातली आग्रा, उत्तर प्रदेश येथील हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री होती. मात्र, सर्व काही सोडून पती अली रिझवी खान यांच्यासोबत न्यूयॉर्क येथे शांततेत जगण्यासाठी गेलेल्या आईला मुलीच्या रूपाने पुन्हा या चंदेरी दुनियेत खेचून आणले. नफिसाने न्यूयॉर्कमधील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. 1998 मध्ये ‘दिल से’ चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून तिचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर दोनच वर्षांनी अमिताभ यांच्यासोबत ‘नि:शब्द’मध्ये मुख्य भूमिका चालून आली आणि तिला आकाश ठेंगणे वाटू लागले. या चित्रपटातील भडक दृश्यांमुळे नफिसा खानला ‘सेक्स अपील’ असा मान मीडियाने दिला. या चित्रपटामुळे गाजलेले ‘जिया’ हे नाव नफिसाने पुढे कायमस्वरूपी धारण केले. तिच्या ऑनस्क्रीन आत्मविश्वासाचे, तिच्या लूकचे एवढे कौतुक झाले होते की तिला फिल्मफेअरच्या पुरस्कारांमध्ये पदार्पणासाठी नामांकन मिळाले होते. त्याचवर्षी ‘गजनी’ चित्रपटात तिला आमिरसोबत काम करण्याची संधी मिळाली. नंतर मात्र अडगळीला पडलेल्या जियाने स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द न बाळगता सपशेल हार पत्करली आणि चैतन्याने सळसळलेल्या देहाला निर्जीव करून टाकले.

‘हाऊसफुल्ल’ शेवटचाच!
कोणत्याही स्ट्रगलरच्या आयुष्यात क्वचितच येणारी संधी जियाला मिळाली; मात्र नंतर माशी शिंकली आणि अल्पावधीत जियाला मिळालेले यश अल्पावधीतच लयाला जाऊ लागले. मध्येच 2008 ला आलेल्या ‘गजनी’नंतर जियाला चांगली भूमिका आणि चांगला चित्रपट मिळालाच नाही. दोन वर्षांनी साजिद खानच्या ‘हाऊसफुल्ल’मध्ये ती ‘चमकली’ मात्र शेवटचीच!

विश्वासच बसत नाही
काय ? जिया खान ? जे झालं ते बरोबर झालं नाही. माझा विश्वासच बसत नाहीये. ’’
- अमिताभ बच्चन, अभिनेता