आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Jiya Khan's Last Rites At Mumbai

शोकाकुल वातावरणात अभिनेत्री जिया खानचा दफनविधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री जिया खान हिच्यावर जुहू येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात बुधवारी दफनविधी करण्यात आला. या वेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. जियाने सोमवारी ‘सागर संगीत’ इमारतीत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
जियाच्या दफनविधीत आमिर खानची पत्नी किरण, आदित्य पांचोली आणि त्याचा मुलगा सूरज, रझा मुराद, ऊर्वशी ढोलकिया, सिद्धार्थ मल्ल्या आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. जियाने 2007 मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या ‘नि:शब्द’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या बिनधास्तपणाचे अनेकांनी कौतुक केले होते. मात्र, त्यानंतर तिला ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ या चित्रपटांशिवाय काम मिळाले नव्हते. त्यामुळे तिला नैराश्य आले होते. त्याचबरोबर बॉयफ्रेंड सूरज पांचोलीचे दुसर्‍या मुलीशी संबंध असल्याच्या कारणावरून ती तणावाखाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने शेवटचा फोन सूरजला केला होता.