आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
निसर्गदत्त सौंदर्याची खाण, कसदार अभिनय आणि मनमोकळ्या, चुणचुणीत स्वभावामुळे कोट्यवधींच्या हृदयात स्थान मिळवलेली माधुरी दीक्षित. वय 46 वर्ष असले तरी आपल्या अदाकारीने एकापेक्षा एक भन्नाट चित्रपटांची मेजवानी दिली आहे. मात्र, माधुरीने चाळीशी ओलांडल्याचे तिचे चाहते मान्य करायला तयारच होत नाही. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे यशोशिखरावर पोहोचलेली माधुरीसुद्धा वय या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही. माधुरी म्हणते, ‘माझ्या मते, वय हा केवळ आकडा आहे, मग ते 10, 20 असो की 100. बुद्धिमत्तेचेही तसेच आहे. उलट वाढत्या वयानुसार बुद्धीदेखील वाढत जाते.’ नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पीटीआयशी बोलताना माधुरीने हे वक्तव्य केले आहे.
80 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेली माधुरी दीक्षित ही श्रीराम नेने या उद्योगपतीशी लग्न झाल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती. पण त्यानंतरही तिने ‘देवदास’ आणि ‘आजा नच ले’सारखे बॉक्स ऑफिस गाजवणारे चित्रपट दिले. आता भारतात परतल्यानंतर ती विविध टीव्ही शोजमध्ये परीक्षक म्हणून तसेच जाहिरात आणि चित्रपटात काम करत आहे. महिनाभरापूर्वी तिचा ‘डेढ इश्किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षक माधुरीच्या ‘गुलाब गँग’मधील धारदार अभिनयाच्या प्रतीक्षेत आहेत.
विवाहित अभिनेत्रींबाबतचे अंदाज म्हणजे भाकडकथा
लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींचे करिअर थांबते, हा निव्वळ पोकळ अंदाज असल्याचे माधुरी दीक्षित म्हणते. हे सिद्ध करण्यासाठी तिने शर्मिला टागोर, राखीचेही उदाहरण दिले. काही अभिनेत्रींनी लग्नानंतर काम करणे थांबवले असेल, पण त्यामागील कारणे वेगळी असतील. अजूनही अनेक विवाहित अभिनेत्री चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत, असे वक्तव्य तिने केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.