आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Madhuri Humiliated In Bhopal By Officer

माधुरीचा अपमान, अधिका-यासह फोटो काढण्यास नकार दिल्याने काढले लाउंजबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अभिनेत्री माधुरी दीक्षित अलीकडेच आपल्या आगामी 'गुलाब गँग' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने भोपाळला गेली होती. तेथून परतत असताना येथील विमातळावरील एका वरिष्ठ अधिका-याने चक्क माधुरीचा अपमान केल्याची घटना घडली.
झाले असे, की भोपाळमध्ये 'गुलाब गँग'चे प्रमोशन करुन झाल्यानंतर माधुरी मुंबईला परतण्यासाठी विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमध्ये थांबली होती. तेथे एका अधिका-याने तिच्यासह छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रमोशनल कार्यक्रमानंतर थकल्यामुळे माधुरीने अधिका-यासोबत छायाचित्र काढण्यासाठी नकार दिला. नाराज झालेल्या अधिका-याने माधुरीला लगेचच व्हीआयपी लाउंजबाहेर जाण्यास सांगितले.
रविवारी वडोदरा येथे 'गुलाब गँग'च्या प्रमोशनच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना तिला याविषयी विचारणा झाली असता, 'मी याविषयी कोणतेही वक्तव्य करु इच्छित नाही', असे माधुरीने म्हटले.