आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Pariniti Chopra Adopted 50 Childrens

परिणीती होणार दत्तक मुलांची आई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री परिणीती चोप्राने मुले दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पन्नास मुले ती दत्तक घेण्याचा विचार करत आहे. त्या मुलांना आर्थिक आणि भावनिक आधार मी देऊ शकते, असे परिणीती सांगते.
आपण हॉलिवूड आणि बॉलीवूडमधून कोणाचीच प्रेरणा घेतली नसल्याचे ती सांगते. याची प्रेरणा मला माझ्या आई- वडिलांकडून मिळाल्याचे परिणीतीचे म्हणणे आहे. माझ्या आई-वडिलांनी ज्या मुलांना दत्तक घेतले होते आज त्यांचे लग्न होऊन ते सुखी आयुष्य जगत आहेत. लहानपणापासून मी हेच पाहत आले आहे. त्यामुळे मीसुद्धा काही मुलांना दत्तक घेऊन त्यांना मदत करू शकते.

सिंगल मॉम होणार का?

या प्रश्नावर ती म्हणाली की, नाही मी सिंगल मॉम होणार नाही, तर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. आणि माझी स्वत:चीही मुले होतील. मात्र मला अजून आर्थिकदृष्ट्या खूप बळकट व्हायचे आहे. जेणेकरून त्या मुलांचे शिक्षण मी चांगल्या प्रकारे करू शकेल.

तसे पाहता मुलांना दत्तक घेणारी परिणीती एकमेव अभिनेत्री नाहीये. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी मुलांना दत्तक घेतले असून त्यांचे पालनपोषण त्या स्वतः करत आहेत.
बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या या मॉम कोण हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...