आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Suchitra Sen Passes Away In Kolkata Hospital

ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे दीर्घ आजाराने निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे कोलकाता येथील खासगी रुग्णालयात आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
50च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या सुचित्रा सेन यांनी 1952 मध्ये बंगाली सिनेमा 'शेष कोथाई'पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. दीप ज्वेले जाई आणि उत्तर फाल्गुनी या प्रसिद्ध बंगाली सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. देवदास, बंबई का बाबू, ममता आणि आंधी हे त्यांचे हिंदीतील गाजलेले सिनेमे आहेत.
1955 मध्ये हिंदी सिनेमा 'देवदास'मध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. 1972 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.