आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकलाकार ते हिरोइन, कुणी वयाच्या चौथ्या तर कुणी सहाव्या वर्षी केली अभिनयाला सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपणी फिल्मी करिअरला सुरूवात करणा-या स्टार्समध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरसुध्दा सामावेश होतो. आज उर्मिलाचा 39वां वाढदिवस आहे. आजसुध्दा तिच्या 'मासूम' सिनेमाचे 'लकडी की काठी, काठी का घोडा' हे गाणे लोकांच्या तोडांतून ऐकायला मिळते. 1983मध्ये आलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूरने या सिनेमामधून दिग्दर्शन करिअरला सुरूवात केली होती. परंतु उर्मिलाने तिस-यांदा बालकलाकारची भूमिका या सिनेमात साकारली होती. यापूर्वी तिने शाम बेनेगल यांच्या 'कलयुग' (1980) आणि एक मराठी सिनेमा 'जकोल' (1980)मध्ये बालकलाकारची भूमिका वठवली होती. 'मासूम' सिनेमात उर्मिलाने नसीरूद्दीन शाह आणि शबाना आझमी यांची मुलगी पिंकीची भूमिका साकारली होती.
एका बालकलाकारच्या रुपात फिल्मी करिअरला सुरूवात करणा-या उर्मिलाला 'नरसिम्हा' या सिनेमात अ‍ॅडल्ट भूमिका मिळाली होती. 1991मध्ये एन.चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सनी देओल आणि डिम्पल कापडिआसुध्दा मुख्य भूमिकेत होते. त्याच्याच पुढच्या वर्षी राजीव मेहरा दिग्दर्शित 'चमत्कार' सिनेमात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. या सिनेमातील तिच्या चुलबुल अंदाजाने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्यानंतर तिला एकामागे एक सिनेमे मिळत गेले आणि वेगवेगळ्या भूमिकेत ती प्रसिध्द होत गेली. 2003मध्ये रामगोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'भूत' सिनेमासाठी तिला फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. उर्मिलाने आजसुध्दा तिच्या फिल्मी करिअरची ओळख कायम ठेवली आहे. 2013मध्ये 'डेल्ही सफारी'मध्ये तिने बेगमच्या पात्राला तिचा आवाज दिला होता आणि 'लाइफ मे हंगामा है' सिनेमात संगीत शिक्षिकेच्या भूमिकेत दिसली होती.
उर्मिलाच्या बॅकग्राउंडविषयी सांगायचे झाले तर, तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फिल्म इंडस्ट्रीशी दुरपर्यंत संबंध नाहीये. 4
फेब्रुवारी 1974ला तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिचे वडील एक प्राधपक होते. बालकलाकारापासून ते आतापर्यंत अभिनय करण्याचा तिचा स्वत:चा निर्णय आहे.
यानिमित्ताने चला बघूया अशा अभिनेत्री ज्यांनी उर्मिलासारखेच बालपणी फिल्मी करिअरला सुरूवात केली आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि भेटा अशा काही अभिनेत्रींना