आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Suffered Domestic Violence

PHOTOS : फक्त युक्ता मुखीचाच नव्हे, या अभिनेत्रींचाही झालाय छळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये महिलाप्रधान अनेक सिनेमे तयार झाले आणि अद्यापही होत आहेत. मात्र प्रत्यक्ष बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. बी टाऊनमध्ये अनेक अभिनेत्रींना मारहाण झाली आहे.
अलीकडेच माजी मिस वर्ल्‍ड युक्ता मुखीने पती आणि सासरच्‍या मंडळीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी नव-याने मारहाण केल्‍याचा आरोप युक्ताने या तक्रारीत केला आहे. तसेच पतीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्‍याचाही आरोप तिने केला आहे.
युक्ता मुखीचा पती प्रिन्‍स तुली आणि त्‍याच्‍या आईवडलांविरुद्ध युक्ता मुखीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्‍यात तिने म्‍हटले आहे, की सासू-सासरे आणि नव-याकडून हुंड्यासाठी माझा छळ करण्‍यात येत होता. पैशासाठी पतीने मारहाण केल्‍याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे.
अभिनेत्रींना मारहाण झाल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींना त्यांच्या प्रियकराकडून किंवा पतीकडून मारहाण झाली आहे. या अभिनेत्री कोण यावर एक नजर टाकुया...