आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बॉलिवूड आणि साऊथ तारकांच्या सौंदर्यामुळे हॉट झाले CCL कॅलेंडर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी क्रिकेट लीगला शनिवारपासून सुरुवात होत आहे. याचा उदघाटन सोहळा 9 फेब्रुवारीला कोच्चिमध्ये होणार आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगची पहिली मॅच केरला स्ट्राईकर्स आणि मुंबई हिरोज यांच्यात लाल नेहरु स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.

पहिल्यांदाच भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री (तामिळ, तेलगू आणि कन्नड)चे अभिनेते एकत्र क्रिकेट मॅच खेळताना दिसतील. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या अभिनेत्यांमध्ये टी-20 फॉर्मेटमध्ये क्रिकेट मॅच होणार आहे.

सेलिब्रिटी क्रिकेट लीग सिझन 3 मध्ये मुंबई हिरोज, चेन्नई राइनॉस, बंगाली टायगर्स, तेलगु वॉरियर्स, कर्नाटका बुलडोजर्स, भोजपुरी दबंग्स, वीर मराठी आणि केरला स्ट्राईकर्स अशा एकून आठ टीम आहेत.
या क्रिकेट लीगला चर्चेत आणण्यासाठी बॉलिवूड आणि साऊथच्या बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींचीही मदत घेतली जात आहे. या लीगमध्ये आठ अभिनेत्री या आठ टीमच्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर असतील.

शिवाय CCL कॅलेंडरसुद्धा लाँच करण्यात आले आहे. यासाठी अभिनेत्रींचे बोल्ड फोटोशूट करुन घेण्यात आले आहे.
आज आम्ही तुम्हाला CCL कॅलेंडरवर झळकलेल्या अभिनेत्रींच्या फोटोशूटची खास छायाचित्रे दाखवत आहोत.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...