आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Bollywood : Third Child Also Boy To Kingkhan Sharukh

किंगखान शाहरुखला तिसरे अपत्यही मुलगाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडचा किंगखान शाहरुखला झालेले तिसरे अपत्य हा मुलगाच असल्याचे बुधवारी उघड झाले. मुंबई महापालिकेने या नवजात बाळाच्या जन्माचा दाखला दिल्यानंतर हे स्पष्ट झाले. सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या या बालकाच्या जन्मापूर्वीच गर्भलिंग चाचणी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केला होता, त्यावरून हे प्रकरण गाजले होते.


महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले की, मनपाला शाहरुख आणि गौरी खानच्या तिस-या अपत्याच्या जन्माचे प्रमाणपत्र रुग्णालयाकडून मिळाले आहे. दाखल्यावरील तपशिलानुसार, अंधेरीच्या मसरानी रुग्णालयात शाहरुखच्या मुलाचा 27 जून रोजी जन्म झाला. या दाखल्यावर आई वडील म्हणून शाहरुख आणि गौरी यांची नावे आहेत. शाहरुखला अगोदरच आर्यन हा मुलगा आणि सुहाना ही मुलगी आहे. मुंबईतील सर्व रुग्णालये व नर्सिंग होमला त्यांच्याकडे होणा-या प्रत्येक प्रसूतीची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्याच्या आधारेच अपत्याचा जन्मदाखला तयार होतो.