आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities At Jiah Khan's Prayer Meet

PHOTOS : जियाच्या शोकसभेत आमिर, दीपिकासह सहभागी झाले बॉलिवूड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या स्मरणात मुंबईतील विले पार्ले मेडिकल क्लबमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिच्या शोकसभेला अभिनेता आमिर खान, दीपिका पदुकोण यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या वेळी रणबीर कपूर, संजय कपूर, प्रतीक बब्बर, नगमा, ऊर्वशी ढोकलिया यांनीही तिच्या राहत्या घरी भेट दिली. या वेळी आमिर खानच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर इतरांनीही आपल्या भावनांना वाट करून जियाच्या आठवणींना उजाळा दिला.

जियाने 3 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेच्या दिवशी तिने अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याला शेवटचा फोन केला होता. शनिवारी जियाच्या कुटुंबीयांना तिने लिहिलेले सहा पानी पत्र सापडले असून यात तिने आपल्या तणावपूर्ण प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. जियाचे कुटुंबीय लवकरच हे पोलिसांना देणार आहेत. दरम्यान, सापडलेले पत्र जियानेच लिहिले का याचा तपास पोलिस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जियाने 2007 मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या ‘नि:शब्द’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. त्या वेळी तिच्या बोल्ड अंदाजाचे सर्वांनी कौतुक केले होते. तिला यासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. यानंतर मात्र, तिला आमिर खानच्या ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ सिनेमांशिवाय काम मिळाले नव्हते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये बघा जियाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेले सेलिब्रिटी...