आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : रात्रभर चालली शाहरुखची ईद पार्टी, पोहोचले 100 हून अधिक स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मिळालेल्या ग्रॅण्ड ओपनिंगचे सेलिब्रेशन मन्नतवर आयोजित केलेल्या ईद पार्टीत केले. यावेळी बॉलिवूडच्या शंभरहून अधिक सेलिब्रिटींनी आपला सहभाग नोंदवून पार्टीला चारचाँद लावले.

शाहरुखची पार्टी रात्री दहाच्या सुमारास सुरु झाली आणि पहाटे चार वाजेपर्यंत चालली. या पार्टीत सगळ्यात आधी पोहोचली ती अभिनेत्री राणी मुखर्जी. रात्री साडे दहाच्या सुमारास राणी मन्नतवर दाखल झाली. त्यानंतर सेलिब्रिटींची रिघ शाहरुखच्या मन्नतवर लागली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पत्नी सायरा बानोबरोबर या पार्टीत पोहोचले.

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरीने मिळून घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. या पार्टीत माधुरी दीक्षित, श्रीदेवी, अनिल कपूर, बोनी कपूर, श्रीदेवी, अर्जुन कपूर, सचिन तेंडूलकर, ऋतिक रोशन, मलायका अरोरा खान, अरबाज खान, सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडेसह बरेच सेलिब्रिटी दिसली. बॉलिवूडचा दबंग सलमान खान मात्र या पार्टीत दिसला नाही.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्याबरोबर सगळ्यात शेवटी म्हणजे रात्री दोनच्या सुमारास पार्टीत सहभागी झाले आणि पहाटे चार वाजता पार्टीतून बाहेर पडले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड स्टार्सची ही लेटेस्ट छायाचित्रे...