आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Most Rare And Interesting Photographs

बघा बी टाऊन सेलिब्रिटींची तुम्ही कधीही न बघितलेली दुर्मिळ छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतीय सिनेसृष्टी अर्थातच बॉलिवूडला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते. या शंभर वर्षाच्या प्रवासात बॉलिवूडने जगाला अनेक महान कलाकार दिले. दरवर्षी तीन हजारांपेक्षा जास्त सिनेमांची निर्मिती करणा-या बॉलिवूडचे सिनेमे 90 देशांत दाखवले जातात.

बॉलिवूड आज जगातील सगळ्यात मोठा फिल्म निर्माता आहे. प्यासा (1957), कागज के फूल (1959), श्री 420 (1955), मदर इंडिया (1957), मुगल-ए-आजम (1960), दो बीघा जमीन (1957), मधुमती (1958) यांसारखे असंख्य अविस्मरणीय सिनेमे बॉलिवूडने दिले आहेत. सिनेमाचे स्वरुप, तंत्रज्ञान, ट्रेंडमध्ये निश्चितच बदल झाला आहे, मात्र त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही. सोबतच सिने कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतच गेली आहे.

तसे पाहता आजच्या तुलनेत जुन्या काळातील अभिनेता-अभिनेत्रींची लोकप्रियता खूप जास्त होती. त्याकाळी अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बरेचसे कलाकार आज आपल्यात नाही. मात्र त्यांच्याविषयी असलेला सन्मान आजही लोकांच्या मनात कायम आहे.

सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हा बॉलिवूडमधील कलाकारांची काही दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहे. ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही कधी बघितली असावी.

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...