आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतो राय यांच्या अटकेच्या विरोधात बॉलिवूड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारा प्रमुख सुब्रतो राय यांच्या अटकेसाठी एकिकडे एक मोठा वर्ग त्यांच्या समाधानी आहे तर काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या अटकेचा विरोध करत आहेत. रविवारी मुंबईमध्ये असेच काही दृश्य बघायला मिळाले. बॉलिवूडचे प्रसिध्द निर्माता रमेश शिप्पी, विनोदवीर आणि अभिनेता जॉनी लीव्हर, फरदीन खान, समीर, राहूल वैद्द, साधना सरगमसारखे अनेक स्टार्सने या विरोधात सहभाग नोंदवला.
लोखंडवालाच्या न्यू लिक रोड परिसरातील न्यासा स्टुडिओमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बी-टाऊनच्या या स्टार्सनी सुब्रतो राय यांच्या बाजूने आपले विचार मांडून त्यांचे समर्थन केले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 1 मार्च रोजी सुब्रतो राय यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या अशा अटकेनंतर बॉलिवूड स्टार्सनी विरोधात हा प्रोजेक्ट अमलात आणला होता. त्याचे नेतृत्व निर्माता आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी केले. रमेश सिप्पी यावेळी म्हणाले, 'आपण इथे सेबी-सुब्रतो केससाठी जमलो नाहीत, त्यासाठी सुप्रीम कोर्ट आहे. आपण यासाठी जमलो आहोत, की आज सुब्रतो यांना एका खलनायकाच्या रुपात सादर केले जात आहे. आपल्यासाठी सुब्रतो एक प्रामाणिक, चांगल्या चरित्र्याचे व्यक्ती आहेत आणि देशभक्त व्यक्ती आहेत.'
शिप्पी यांच्या व्यतिरिक्त तिथे उपस्थित बॉलिवूड स्टार्सनीही त्यांचे मत सांगितले. यावेळी फरदीन खान म्हणाला, 'जोपर्यंत गुन्हा सिध्द होत नाही तोपर्यंत व्यक्ती निर्दोष असतो. त्यामुळे सुब्रतो राय यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक संधी मिळाला हवी.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुब्रतो राय यांच्या अटकेच्या विरोधात उतरलेल्या बॉलिवूड स्टार्सची काही छायाचित्रे...