सामान्यातील असामान्य अभिनेता फारूख शेख यांच्यावर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री दीप्ती नवल, सोनाली बेंद्रे, फरहान अख्तर, शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला. सोमवारी दुपारी चार वाजता त्यांचा मृतदेह दुबईहून मुंबईत आणण्यात आला. शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. फारूख यांनी गर्म हवा, कथा, उमराव जान यासह आदी चित्रपटांत काम केले होते. ‘जीना इसी का नाम है’ हा छोट्या पडद्यावरील त्यांचा कार्यक्रम विशेष गाजला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अंत्यसंस्काराचे काही छायाचित्रे...