'बिग बॉस' सिझऩ 6मध्ये दुसरी रनरअप ठरलेल्या सना खानसाठी बॉलिवूडची दारे उघडली आहेत. सनाने सांगितले की, ''मला तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या सिनेमांमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र जेव्हा माझे आईवडील माझे सिनेमे बघत होते, तेव्हा आम्हाला काही समजेल असे काम कर, असे ते म्हणायचे. आता बिग बॉसनंतर मला बॉलिवूडच्या ऑफर्स यायला सुरुवात झाली आहे.''
सनाला तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाविषयी विचारले असता ती म्हणाली की, ''मी आत्ता याबद्दल तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. मात्र तुम्ही लवकरच मला मोठ्या पडद्यावर बघणार हे निश्चित झाले आहे. जोपर्यंत सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल.''