आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MUMBAI GANG RAPE: बिग बींची कठोर शिक्षेची मागणी, कलाकारांनी व्यक्त केला रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - मुंबईतील शक्ती मिल कंपाउंडमध्ये गँगरेपची शिकार झालेल्या महिला छायाचित्रकाराने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची मागणी केली आहे. पीडित तरुणीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी तिचे कुटुंबिय जेव्हा पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा तिने, माझ्यावर शारीरिक आणि मानसिक आघात करणा-यांना जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा झाली नाही पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तिच्‍यासोबतच तिचा सहकारीही आरोपींची ओळख पटविण्‍यास तयार आहे. पीडितेवर बलात्‍कार करताना आरोपींनी त्‍यालाही बेदम मारहाण केली होती.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दोघांची ओळख पटली आहे. तसेच आणखी एकाला शनिवारी पहाटे अटक करण्यात आले आहे. विजय जाधव असे आरोपीचे नाव आहे.

या खळबळजनक घटनेवर संपूर्ण देशात रोष व्यक्त केला जातोय. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सेलिब्रिटी काय म्हणाले, ते पुढे वाचा...