आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानची फसवणूक करणार्‍या निर्मात्यास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिनेता सलमान खानला गोळीबाराच्या खोट्या घटनेत अडकवण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी एका चित्रपट निर्माता आणि त्याच्या भाच्याला अटक केली आहे. निर्माता हरदेवसिंग यांनी स्वत:वर हल्ला झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. तक्रारीत त्यांनी अभिनेता सलमान खान व त्याची व्यवस्थापक रेश्मा शेट्टी यांच्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. पोलिस उपायुक्त (सेंट्रल)आलोककुमार यांनी सांगितले की, 16 डिसेंबर रोजी चित्रपट निर्मात्याने हल्ल्याची
तक्रार दाखल केली होती. दोन बाइकस्वारांनी आपल्यावर हल्ला केला, असे त्याने म्हटले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता ही तक्रार खोटी असल्याचे आढळून आले.