आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Happy Over Salman And Shahrukh Friendship

सलमान-शाहरुखच्या मैत्रीने बॉलीवूड झाले आनंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि दबंग सलमान खान यांनी पाच वर्षे जुना वाद विसरून पुन्हा मैत्रीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यामुळे या दोघांबरोबरच संपूर्ण बॉलीवूडमध्येच आनंद निर्माण झाला आहे.

शाहरुख आणि सलमान यांच्यातील वाद संपवण्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह इंडस्ट्रीतील दिग्गज अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये हा सोन्याचा दिवस उजाडला. आमदार बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये या दोघांनी गळाभेट घेत जणू आपल्यातील वाद मिटल्याचेच जाहीर केले. संपूर्ण बॉलीवूडसाठीच हा क्षण आनंद देणारा ठरला. त्याचे कारण म्हणजे या दोघांमधील वादामुळे नकळत इंडस्ट्रीमध्येही दोन गट निर्माण होऊ लागले होते.

दोघांच्या मैत्रीमध्ये पाच वर्षांपूर्वी कॅटरिना कैफच्या वाढदिवसात झालेल्या वादाने ठिणगी पडली होती. त्यानंतर या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. दोघे एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागले, तसेच टीका-टिप्पणीही करायचे. तसाच काही वेळा या दोघांनी एकमेकांचा मानही ठेवला. शाहरुखने या प्रकरणी ट्विट करताना म्हटले की, जुन्या आठवणींना उजाळा देणे हा अत्यंत सुखद अनुभव आहे. पुस्तकाच्या एकाच पानावर अडकून राहता कामा नये. कारण पुस्तकात इतरही बरेच काही असते.