आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो नंबर वन बनला सलमान ? 'एक था टायगर'वर पाकिस्‍तानात बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीबुड अभिनेता सलमान खानचा सिनेमा 'एक था टायगर'ची डरकाळी हिंदुस्‍तानसह संपूर्ण जगात गुंजत आहे. परंतु सल्लु मिय्याच्या या सिनेमाला पाकिस्‍तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्‍तान सेंसर बोर्डाने 'एक था टायगर'वर निर्बंध घातल्याने हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार नाही, अशी माहिती पाकमधीलचे फिल्‍म वितरक आतिफ रशिद यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान सेंसर बोर्डाच्या एका रिव्यू पॅनलने 'एक था टायगर' पाहिल्यानंतर सिनेमा पाकमध्ये रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, याबाबत पाकिस्तान सरकारी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, पडद्यावर सलमान-कॅटरिनाची 'केमिस्ट्री', त्याला यशराज बॅनरचा साज आणि भारत- पाकिस्तान संबंधावर आधारित कथा. या सर्व बाबी 'एक था टायगर'मध्ये एकत्र आल्या आहेत. यामुळे 'एक था टायगर'वर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या नसतील तरच नवलच! 'एक था टायगर'ने पहिल्याच दिवशीच दिवशी 33 ते 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा एक विक्रम आहे. एकाच दिवशी एवढी कमाई करणारा 'एक था टायगर' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यामुळे सलमान खानचे बॉलिवूडमधील 'वजन' वाढले असल्याचे बोलले जात आहे. सलमान खान बॉलीवुडचा ‍'हीरो नंबर वन' बनण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बॉलीवूडमधील ट्रेड अँनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, आता सर्व ठिकाणांहून आकडे एकत्र करण्यात येत आहेत. हा आकडा 33 ते 35 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विटरवर ट्विट केल्यानुसार, 'एक था टायगर'ने पहिल्याच दिवशी 33 ते 35 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची अधिकृत माहिती आहे. तरण आदर्श यांनी सांगितले की, 'एक था टायगर' बुधवारी अमेरिकेतील 90 ठिकाणी रिलीज करण्यात आला. त्यातून 1,58,000 डॉलर्सचे (सुमारे 87 लाख 88 हजार रुपये) कलेक्शन झाले आहे.
आणखी 30 ठिकाणांहून आकड्यांची प्रतीक्षा आहे. ब्रिटनमध्ये 'एक था टायगर'ने 1,75,000 डॉलरची कमाई केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. ईद आणखी तीन ते चार दिवसांनी आहे. त्या वेळी 'एक था टायगर' मोठय़ा प्रमाणात गर्दी खेचण्याची शक्यता आहे. पहिल्याच आठवड्यात 200 कोटींची कमाई करणारा 'एक था टायगर' हा पहिलाच चित्रपट ठरेल.
आपले मत-
'एक था टायगर'च्या अभूतपूर्व यशामुळे सलमान खान बॉलीवुडचा 'हीरो' बनला आहे काय? आपले मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्‍समध्ये नोंदवा.

मूव्ही रिव्यू: पैसा वसूल...'एक था टायगर'
फराहचा खुलासा, 'बोमन नाही तर सलमान होता माझी फर्स्ट चॉईस'
सलमान खान अडचणीत, 'एक था टायगर' विरोधात याचिका दाखल
NEW STILLS: सलमान-कतरिनाचा फुलऑन रोमान्स