आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक था टायगर'वर पाकमध्ये बंदी कायम; 'यशराज फिल्मस्'चे 12 कोटी रुपयांचे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खानच्या 'एक था टायगर'ची डरकाळी भारतासह परदेशातही गुंजत आहे. परंतु, पाकिस्तानात 'एक था टायगर'च्या रिलीजवर बंदी घालण्यात आल्याने यशराज फिल्मस् चे सुमारे 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितले की, शुक्रवारी वर्किंग डे असतानाही 'एक था टायगर'ने रेकॉडो ब्रेक कमाई केली आहे. काही चित्रपटांना तर ही कमाई वीकेंडला देखील करता येत नाही. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर 'एक था टायगर' रुपरी पडद्यावर झळकला होता. रिलीज डेटला या चित्रपटाने 32.93 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर गुरुवारीही 'एक था टायगर'ने 14.50 कोटी रुपये कमवले. शुक्रवारची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
'एक था टायगर'ला परदेशातही तुफान प्रतिसाद मिळत आहे. तरण यांच्या मते, 'एक था टायगर'ने अमेरिकेत सुरुवातीच्या दोन दिवसात 1.90 कोटी, यूकेमध्ये 1.25 कोटी, ऑस्‍ट्रेलियात 65.73 लाख, यूएईमध्ये 1.96 कोटी आणि न्‍यूझीलंडमध्ये 10.40 लाख रुपयांची भरभरून कमाई केली आहे.
दरम्यान, सल्लु मिय्याच्या या सिनेमाला पाकिस्‍तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्‍तान सेंसर बोर्डाने 'एक था टायगर'वर निर्बंध घातल्याने हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार नाही, अशी माहिती पाकमधीलचे फिल्‍म वितरक आतिफ रशिद यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान सेंसर बोर्डाच्या एका रिव्यू पॅनलने 'एक था टायगर' पाहिल्यानंतर सिनेमा पाकमध्ये रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, याबाबत पाकिस्तान सरकारी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
'एक था टायगर'ने बॉक्‍स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. सलमान खान बॉलीवूडमधील सगळ्यात मोठा खान बनला आहे, अशी चर्चा जोर धरत आहे. 'एक था टायगर'च्या अभूतपूर्व यशानंतर सलमान बॉलीवूडमधील 'हीरो नंबर वन' होऊ शकेल? तुम्हाला काय वाटते? खाली दिलेल्या कमेंट बॉक्‍समध्ये तुम्ही आपले मत नोंदवू शकतात.

PIX: 100 कोटींच्या क्लबचा 'टायगर' सलमान खान
PHOTOS : सलमान करतोय 'एक था टायगर'च्या यशाचे सेलिब्रेशन
हीरो नंबर वन बनला सलमान ? 'एक था टायगर'वर पाकिस्‍तानात बंदी