आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Photographer Jagdish Mali Found Abandoned On Mumbai Street

रेखाला यशोशिखरावर पोहोचवणारी व्यक्ती रस्त्यावर मागतेय भीक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री रेखाची सुंदरता आपल्या कॅमे-यातून अधिक खुबीने खुलवणारे फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळीचे वडील जगदीश माळी रस्त्यावर भीक मागताना आढळले. जगदीश माळी फाटक्या-मळलेल्या कपड्यांत वर्सोवा रोडवर दिसले.

‘बिग बॉस सीझन 6’ या कार्यक्रमात झळकलेली मिंक बरार आपल्या भावासोबत वर्सोवाच्या रोडवर बसलेल्या भिका-यांना घोंगड्या दान करत होती. त्यावेळी तिची नजर जगदीश माळी यांच्यावर गेली. मिंकला जगदीश भिका-यांच्या रांगेत उभे दिसले. जगदीश यांना ओळखण्यात तिला जास्त वेळ लागला नाही. मिंक आणि तिच्या भावाने जगदीश माळी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

मिंकने दिलेल्या माहितीनुसार, जगदीश माळी खूपच डिस्टर्ब दिसले. मिंकने त्यांना ‘तुम्हाला कुठे जायचंय?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी माझ्या स्टुडिओत जायचे आहे असे उत्तर दिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगदीश यांनी काही वर्षापूर्वीच आपला स्टुडिओ विकून टाकला होता. मात्र आता त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे. पण त्यांना अजूनही स्टुडिओ आठवतोय.

सलमानने दिला मदतीचा हात...
मिंकने सलमान खानला जगदीश माळी यांच्याबद्दल माहिती दिली. तेव्हा सलमानने जगदीश यांनी घरी पोहचवण्यासाठी कार पाठवली. सोबत मदतीला चार जणांनाही पाठवले. जगदीश माळी एकटेच आरम नगर येथे राहतात.


अंतरा माळीने हात झटकले...
जगदीश माळ यांची मुलगी अंतरा माळीला याविषयी कळविण्यात आले. मात्र तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपल्याला नुकतंच एक बाळ झालंय आणि त्यामुळे खूप बिझी असल्याचे अंतराने म्हटले.

(रेखाचे छायाचित्रे जगदीश माळी यांच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन घेण्यात आले आहे.)