आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड : ‘रज्जो’चा नायक अल्पवयीन ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या ‘रज्जो’ चित्रपटातील नायकाच्या वयावर सेन्सॉर बोर्डाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘अभिनेत्याच्या वयाबाबत दिग्दर्शकाने फेरविचार करावा’, असे म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे.
‘रज्जो’मध्ये कंगणा राणावत हिने 24 वर्षीय वेश्येची भूमिका साकारलेली आहे, तर कलर्स वाहिनीवरून ‘वीर शिवाजी’फेम पारस अरोरा याने 18 वर्षीय तरुणाचे पात्र केले आहे. या चित्रपटात अभिनेता वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी विवाह करतो, असे दाखवण्यात आले आहे. केवळ या बाबीमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे दिग्दर्शकाने चित्रपटात अभिनेत्याचे वय 18 वरून 21 दाखवावे, अशी सूचना सेन्सॉर बोर्डाने पाटील यांना केली आहे.
पाटील म्हणाले, मी बोर्डाचा आदर करतो. मात्र, चित्रपटात अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या वयाचा एकाही सीनमध्ये उल्लेख नाही. आम्ही बोर्डाला याबाबत पत्र पाठवून त्यांची संमती घेऊ.