आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयला भोगावा लागणार साडे तीन वर्षांचा तुरुंगवास, बॉलिवूडला मोठा धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज आपला फैसला सुनावला. या प्रकरणात बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगण्याच्या आरोपात अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने यापूर्वी 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
संजयला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
एक नजर टाकुया सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी काय ट्विट केले...