आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या घरी पोहोचले बॉलिवूड कलाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूची बातमी कळताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास जियाने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच बॉलिवूडमधील काही कलाकार तिच्या घरी पोहोचले.
जियाच्या घरी सगळ्यात पहिले पोहचणारे होते आदित्य पंचोली आणि त्यांचा मुलगा सुरज पंचोली. सुरज आणि जिया यांच्यात घट्ट मैत्री असल्याचे बोलले जात आहे. आदित्य आणि सुरज पंचोली यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री उर्वशी ढोलकियासुद्धा जियाच्या घरी पोहोचली.
कूपर रुग्णालयात जियाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार होते. मात्र अपु-या सुविधांमुळे जियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
बघा जियाच्या घरी पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...