आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लक्ष्मी’च्या स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड स्टार्स, पाहा PIX

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागेश कुकनूर दिग्दर्शित 'लक्ष्मी' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग 10 मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. या स्टार्समध्ये अरबाज खान, हेलन, एली अवराम, शैफाली शाह, आशा पारेख, मोनाली ठाकूर, सलीम खान, मिनी माथूर, पूरब कोहली यांचा समावेश होता.
'लक्ष्मी' ही कहाणी आहे एका तेरा वर्षांच्या मुलीची. काही लोक तिचं अपहरण करुन तिला कोठ्यावर विकतात. कोठ्याचे मालक सुरुवातीला तिच्यासोबत दुष्कर्म करतात आणि नंतर तिला देह व्यापार करायला भाग पाडतात. मात्र समाजसेविका उमा पोलिसांच्या मदतीने त्या कोठ्यावर छापा टाकतात आणि लक्ष्मीप्रमाणेच अनेक तरुणींची सुटका करतात. लक्ष्मीला तिच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्यात येतं. त्यानंतर कथेला रंजक वळण प्राप्त होतं.
'लक्ष्मी' हा एक मल्टीस्टारर सिनेमा असून यात मोनाली ठाकूर, सतीश कौशिक, राम कपूर, शैफाली शाह, गुलफाम खान आणि विभा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नागेश कुकनूर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 21 मार्चला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'लक्ष्मी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...