आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : \'जल\'चे म्युझिक लाँच, सुनील शेट्टी-सोनू निगमसह पोहोचले बरेच स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरीश मलिक दिग्दर्शित 'जल' या आगामी सिनेमाचे 19 मार्च रोजी मुंबईत म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी गायक सोनू निगमने आपल्या सादरीकरणाने या कार्यक्रमाला चारचाँद लावले. जल या सिनेमाला सोनू निगम आणि बिक्रम घोष यांनी संगीत दिले आहे.
कोण-कोण पोहोचले?
'जल'च्या म्युझिक लाँचसा अभिनेता सुनील शेट्टी, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, गिरीश मलिक, सिनेमात मेन लीड साकारणारा अभिनेता पूरब कोहली, तनिष्ठा चॅटर्जीसह बरेच सेलेब्स पोहोचले होते.
काय आहे 'जल'चे वैशिष्ट्य...
कच्छमधील पाणी समस्येवर हा सिनेमा भाष्य करतो. बक्का (पूरब कोहली) ज्योतिषी असून पाण्याविषयी भाकित वर्तवत अशतो. गावातील पाणी समस्येवर त्याला निदान शोधायचे आहे.
एकेदिवशी एख परदेशी पक्षी तज्ज्ञ महिला राजहंसच्या बचावासाठी कच्छमध्ये पोहोचते. बक्का तिच्या मदतीसाठी पुढे येतो. सिनेमात दुष्काळासह प्रेम, नातेसंबंध, शत्रुत्व याची सरमिसळही पाहायला मिळणार आहे.
अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला सिनेमा...
बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासह अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला आहे.
कोण-कोण आहे सिनेमात...
पूरब कोहली, तनिष्ठा चॅटर्जी आणि किर्ती कुल्हारी हे कलाकार मेन लीडमध्ये असून याशिवाय मुकुल देव, यशपाल शर्मा, राहुल सिंह, रवि गौसेन आणि रोहित पाठक या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
गिरीश मलिक दिग्दर्शित हा सिनेमा 4 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'जल'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...