आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याच्या समुद्र किनारी प्रियंकाने विकत घेतला आणखी एक बंगला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लॅमर दुनियेतील कलाकार आपल्या बंगल्यांमुळे नेहमी चर्चेत राहतात. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नुकताच गोव्यामध्ये एक बंगला विकत घेतला आहे. काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी आणखी एक बंगला विकत घेतला. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद' बंगला त्यांच्या निधनानंतर बराच चर्चेत राहिला. या बंगल्यामुळे राजेश खन्ना यांची मैत्रीण अनिता आडवाणी आणि पत्नी डिम्पल कपाडिया यांच्यामधील वाद आजही सुरु आहे.

प्रियंकाचा बंगला गोव्यातील प्रसिद्ध ठिकाण 'बागा बीच'वर आहे. प्रियंका आणि तिच्या कुटुंबातील सदस्य हॉलिडेसाठी या बंगल्याचा वापर करतात. प्रियंकाला 'बागा बीच' खूप आवडते. समुद्र किनारी काही काळ शांततेत व्यतीत करण्यासाठी प्रियांकाने गोव्यामध्ये हा बंगला विकत घेतला आहे.

मागील महिन्यात प्रियंकाने दहा दिवस या बंगल्यामध्ये वास्तव्य केले. या दिवसांमध्ये तिने गोव्यामध्ये आपली टीम आणि ट्रेनर समीर जाउरासोबत 'मेरी कॉम'च्या जीवनावर तयार होणा-या चित्रपटाची ट्रेनिंग घेतली.या चित्रपटात प्रियंका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.