आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्वीन'च्या स्क्रिनिंगला सोनाक्षीसह पोहोचले बॉलिवूड स्टार्स, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 28 फेब्रुवारीला मुंबईत अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी 'क्वीन' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला कंगनासह बी टाऊनमधील बरेच स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी कंगनाची हटके स्टाईल बघायला मिळाली.
कोण-कोणते स्टार्स पोहोचले होते?
राजकुमार यादव, आनंद एल. राय, तिग्मांशु धूलिया, सोनाक्षी सिन्हा, दिया मिर्जा, हुमा कुरैशी, ऋचा चड्ढा, करिश्मा तन्ना, राजीव खंडेलवाल, स्वरा भास्कर, सोफी चौधरी हे स्टार्स 'क्वीन'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसले.
कंगनाचा 'क्वीन' या सिनेमाची कथा दिल्लीतील एका सामान्य तरुणीभोवती गुंफण्यात आली आहे. ही तरुणी पहिल्यांदा जगाच्या प्रवासाला निघते. विकास बहल यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या सिनेमाचे निर्माते आहेत.
या सिनेमात कंगनासह लीसा हेडन आणि राजकुमार यादव प्रमुख भूमिकेत आहेत. 7 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा क्वीनच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...