आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात नवीन वर्षाचा जल्लोष: पतीशिवाय शिल्पा तर एकटाच निघाला रितेश!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्ष येण्यासाठी अजून एक दिवस बाकि आहे आणि बॉलिवूड स्टार्सने अधिच नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. नवीन वर्षाच्या धमाकेदार सुरूवातीसाठी या स्टार्सने परदेशी भरारी घेतली आहे. प्रियंका चोप्रा, फराहान अख्तर याचबरोबर बरेच स्टार्स मुंबई एअरपोर्टवर दिसले. यावेळी शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्राशिवाय एकटीच नवीन वर्ष साजरा करायला गेली आहे आणि रितेशसोबतसुध्दा त्याची पत्नी जेनेलिया डी-सूजा दिसली नाही.
फरहान अख्तर त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत दिसला. माध्यमांनी फरहान अख्तरची पत्नी आणि मुलगी यांची पहिली झलक कॅमे-यामध्ये कैद केली. 2013 वर्ष फरहानसाठी खूप लकी ठरले आणि त्याचा निर्माता बनी फुकरे याने यशाचे झेंडे गाडलेत, आणि त्याचा 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा ब्लॉकब्लस्टर ठरला.
बॉलिवूडचे जवळपास सर्वच स्टार्स नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात भरारी घेत आहे. प्रियंका चोप्रा 31 डिसेंबरला चेन्नईच्या पार्क हयात हॉटेलमध्ये परफॉरमन्स देणार आहे. प्रियंकाने काढलेला एक फोटोसुध्दा शेअर केला आहे.
पुढील स्लाइड्सवर बघा एअरपोर्टवर कॅमे-यामध्ये कैद केलेल्या या स्टार्सचे काही खास छायाचित्रे...