आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दिव्याच नव्हे, या सेलिब्रिटींनीही कमी वयातच घेतला जगाचा निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बॉलिवूडमध्ये ब-याच अभिनेत्री आहेत. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर त्यांनी बी टाऊनमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. मात्र गतकाळातील काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्यांना त्यांच्या अभिनय आणि खास अंदाजासाठी आजही स्मरले जाते. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे क्यूट आणि बबली दिव्या भारती.
दिव्या भारतीचा आज (25 फेब्रुवारी) 40 वा वाढदिवस आहे. ती आज या जगात नाही. वयाच्या केवळ 19 व्या वर्षी कायमची निघून गेली. 5 एप्रिल 1993 मध्ये पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिव्या भारतीने आत्महत्या केली होती की तिची हत्या करण्यात आली, हे आजही न उलगडलेले कोडे आहे. दिव्याला आजही ऋषी कपूर आणि शाहरुख खानबरोबर आलेल्या 'दिवाना' सिनेमासाठी स्मरले जाते.
दिव्याप्रमाणेच असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का पोहोचला होता. यापैकी बहुतांश सेलिब्रिटींच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
स्लाईड्स शोच्या माध्यमातून एक नजर टाकुया अशा सेलिब्रिटींवर ज्यांनी वेळेआधीच या जगाचा निरोप घेतला...