आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONTROVERSY: फक्त सलमानच नव्हे, या सेलिब्रिटींनीसुद्धा केलीय तुरुंगवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानवर कोर्टाची तलवार लटकत आहे. 28 सप्टेंबर 2002 साली सलमान लँड क्रूजर या गाडीने आपल्या घरी परतत होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास अमेरिकन बेकरीजवळ सलमानच्या भरधाव येणा-या गाडीने फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना धडक दिली. या दुर्घटनेत एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी सलमान दारुच्या नशेत गाडी चालवत होता.
याप्रकरणी सलमान विरोधात कलम 304 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र नंतर बांद्रा कोर्टाने 17 साक्षीदारांच्या जबाबानंतर कलम 304 भाग 2 अंतर्गत खटला चालवण्याचा आदेश दिला होता.
सलमानने बांद्रा कोर्टाच्या निर्णयाविरोधात सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला होता. 23 जून 2013 रोजी सेशन्स कोर्टाने सलमानचा अर्ज फेटाळला होता.

याप्रकरणी सलमान खानला कोर्टाने झटका दिला आहे. सेशन कोर्टाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला आहे.

बुधवारी सकाळी अकरा वाजता सलमान बहिणीसोबत कोर्टात दाखल झाला. त्यानंतर त्याच्या वकिलांनी पुढील तीन महिने सलमान शुटींगमध्ये व्यस्त असल्याने सुनवाणी पुढे ढकलण्याची विनंती केली. तेव्हा कोर्टाने सलमानचा हा अर्ज फेटाळत बुधवारीच आरोप निश्चिती केली. त्याच वेळी पुढील सुनावणीलाला गैरहजर राहाण्याची आणि परदेशात जाण्याचीही परवानगी दिली.

बॉलिवूडमध्ये आरोपीच्या पिंज-यात उभा असलेला सलमान खान एकमेव अभिनेता नाहीये. यापूर्वीही काही आघाडीच्या अभिनेत्यांना तुरुंगवारी केली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या सेलिब्रिटींनी तरुंगवारी केली आहे...