आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Yet To Come To Rescue Of Mubarak Begum

प्रसिद्ध गायिका हलाखीच्या परिस्थितीत, बॉलिवूडने फिरवली पाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम सध्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन व्यतित करत आहेत. 70 वर्षीय मुबारक बेगम यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांची तब्येतही ठिक नसते. शिवाय त्यांच्या 40 वर्षीय आजारी मुलीचीही जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने एक काळ गाजवणा-या मुबारक बेगम यांच्याकडे बॉलिवूडने पाठ फिरवली आहे. एकाही बॉलिवूड सेलिब्रिटीने त्यांची विचारपूस केलेली नाहीये.

संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान बघता बॉलिवूडमधून त्यांची विचारपूस होईल असे वाटत होते. मात्र अनेक मुलाखतींच्या माध्यमातून मुबारक बेगम यांनी आपली हलाखीची परिस्थिती सगळ्यांना सांगितली. मात्र एकही निर्माता-दिग्दर्शक किंवा कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही.

आज बॉलिवूडमध्ये प्रत्येत निर्माता-दिग्दर्शक शंभर कोटींच्या क्लबबद्दल बोलताना दिसतो. कलाकारसुद्धा मानधनाचा मोठा आकडा घेतात. मात्र बॉलिवूडच्या या लेजेंड्सकडे कुणीच लक्ष देत नाही.

जेव्हा बॉलिवूडमधून कुणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही, तेव्हा खुर्शीद अनवर यांनी फेसबूकच्या माध्यमातून त्यांचे दुःख जगासमोर मांडले.

त्यांनी आपल्या फेसबूक वॉकवर पोस्ट केले की, ''महान गायिका मुबारक बेगम अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. सरकार किंवा फिल्म इंडस्ट्रीकडून त्यांना विचारणा होत नाहीये. त्या स्वतः आजारी असून आजारी मुलीची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर आहे. त्यांची परिस्थिती बघून मन भरुन आले. आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. मी दहा हजारांपेक्षा त्यांना जास्त मदत करु शकत नाही... आणि तुम्ही ???''