सुपरहिट 'आशिकी 2' सिनेमाची गाणी अजूनही चार्ट बस्टरमध्ये सर्वात पुढे आहेत. श्रध्दा कपूरला या सिनेमाच्या यशाने अनेक मोठ्या बजेट सिनेमांचे ऑफर मिळायला लागल्या आहेत. बातमी आहे, की श्रध्दाला आलेल्या ऑफरमधून खूप विचार करून सिनेमे साइन करायचे आहेत. म्हणून तिने काही चांगल्या पटकथा असलेल्या पण छोट्या बजेटच्या सिनेमांना नकार दिला आहे.
आता 'पापा' शक्ती कपूरने मुलीसाठी योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पटकथा व्यतिरिक्त श्रध्दा कपूर कोणत्या बॅनरसोबत जोडली जाईल आणि कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करणार आहे, हे सर्व निर्णय आपल्या अनुभवाच्या आधारे शक्ती कपूर घेणार आहेत.
चला आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगणार आहोत, की बॉलिवूडच्या अशा तरूणींविषायी ज्यांच्या 'मम्मी-पापा'नेसुध्दा सिनेमात अभिनय केला आहे...