आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : किशोर कुमार यांनी मधुबालासाठी सोडले होते पत्नी-मुलांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड तारे-तारकांचं आयुष्य खूपच वादग्रस्त असतं. येथे काहींनी प्रेमाच्या आणाभाका एकाशी घेतल्या, मात्र लग्न कुण्या दुस-याशीच केले. काही सेलिब्रिटींचे आपल्या लाईफ पार्टनरबरोबर पटले तर काहींचे लग्न घटस्फोटावर येऊन थांबले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक सेलिब्रिटींचे दुसरे लग्नही टिकू शकले नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
असे सांगितले जाते की, चित्रांगदाने तिचा पती ज्योति रंधावाबरोबर घटस्फोट घेण्यासाठी गुडगाव कोर्टात अर्ज दाखल केला आहे. चित्रांगदाने मात्र घटस्फोटाच्या बातम्या फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र या बातम्यांमुळे बॉलिवूडच्या वादग्रस्त लग्नांच्या यादीत चित्रांगदाचे नाव सामिल झाले आहे.
एक नजर टाकुया बॉलिवूडच्या काही वादग्रस्त जोड्यांवर...